Anuradha Vipat
घरीच बनवा हॉटेलसारखी चमचमीत आणि तोंडात पाणी आणणारी दही पुरी चाट. ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे.
पाणीपुरीच्या पुऱ्या, बटाटा आणि चणे,दही तिखट पुदिना-कोथिंबीर चटणी आणि गोड चिंच-गुळाची चटणी, चाट मसाला, भाजलेली जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ, बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे.
एका सर्व्हिंग प्लेटमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवून त्यांच्या मध्यभागी हलकेच होल (छिद्र) करून घ्या. प्रत्येक पुरीमध्ये थोडे उकडलेले बटाटे आणि चण्याचे मिश्रण भरा. त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा टाका.
आता प्रत्येक पुरीमध्ये आधी थोडी तिखट पुदिना चटणी आणि नंतर भरपूर गोड चिंच-गुळाची चटणी टाका.
यानंतर पुऱ्यांवर भरपूर फेटलेले गोड दही टाका. पुऱ्या पूर्णपणे दह्याने कव्हर झाल्या पाहिजेत.
दह्यावर चवीनुसार चाट मसाला, जिरे पूड, लाल तिखट आणि थोडे मीठ वरून भुरभुरा.
शेवटी त्यावर भरपूर बारीक शेव, चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सजवा.