Anuradha Vipat
हिवाळ्यात ऊन सौम्य असल्याने अनेकजण सनस्क्रीन लावणे टाळतात. मात्र, थंडीतही सूर्याची अतिनील किरणे त्वचेचे मोठे नुकसान करू शकतात.
त्वचा तज्ज्ञांच्या मते, ऋतू कोणताही असला तरी दिवसा घराबाहेर पडताना किंवा अगदी घरात असतानाही सनस्क्रीन लावणे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
हिवाळ्यात उन्हाचा चटका जाणवत नसला तरी सूर्याची हानिकारक UVA आणि UVB किरणे वातावरणात सक्रिय असतात.
हिवाळ्यातील UVA किरणे त्वचेच्या खोलवर जाऊन कोलेजन नष्ट करतात. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, बारीक रेषा दिसणे आणि त्वचा सैल पडणे यांसारख्या समस्या लवकर सुरू होतात.
थंडीच्या दिवसांत हवा कोरडी असल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. अशा कोरड्या आणि संवेदनशील त्वचेवर सूर्यकिरणांचा परिणाम अधिक वेगाने होतो, ज्यामुळे त्वचा काळवंडणे आणि डाग पडण्याची शक्यता वाढते.
हिवाळ्याच्या महिन्यांत पृथ्वीवरील ओझोनचा थर काहीसा पातळ असतो, त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून मिळणारे नैसर्गिक संरक्षण कमी होते.
हिवाळ्यासाठी किमान SPF 30 किंवा त्याहून अधिक (SPF 50) आणि 'ब्रॉड-स्पेक्ट्रम' सनस्क्रीन निवडावे.