Anuradha Vipat
लहान मुले जेवताना नखरे करतात किंवा त्यांना भूक लागत नाही, ही बहुतांश पालकांची मुख्य तक्रार असते.
मुलांची भूक कमी होण्यामागे अपचन, पोटात जंत असणे, शारीरिक हालचाल कमी असणे ही कारणे असू शकतात.
अर्धा चमचा आल्याच्या रसात थोडे मध मिसळून ते चाटण मुलाला जेवणापूर्वी द्यावे. यामुळे पाचक रस तयार होतात आणि भूक वाढते.
रात्री पाव चमचा ओवा कोमट पाण्यासोबत द्यावा. ओव्यामुळे पचनक्रिया वेगाने सुधारते.
जास्त दूध प्यायल्याने मुलांचे पोट भरलेले राहते आणि त्यांना अन्नाची भूक लागत नाही.
मुलांना एकाच वेळी भरपूर जेवण देण्याऐवजी दर २-३ तासांनी लहान प्रमाणात पौष्टिक फळे, सुकामेवा किंवा नाश्ता द्या.
मुलांना रोज किमान १ तास मैदानी खेळ खेळू द्या किंवा सायकलिंग, धावणे असा व्यायाम करू द्या.