Guava Leaves Tea : पेरूच्या पानांचा चहा: वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय! पाहा रेसिपी

Anuradha Vipat

आयुर्वेदिक उपाय

वाढलेले वजन आणि पोटाभोवतीची जिद्दी चरबी कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा चहा हा एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे.

Guava Leaves Tea | agrowon

वजन

हा चहा शरीरातील चयापचय क्रिया जलद करतो आणि स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो, ज्यामुळे वजन नैसर्गिकरीत्या कमी होते.

Guava Leaves Tea | Agrowon

साहित्य

ताजी पेरूची पाने,पाणी,आल्याचा तुकडा,लिंबाचा रस,मध किंवा गूळ.

Guava Leaves Tea | agrowon

पद्धत

पेरूची ताजी पाने पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील धूळ किंवा माती निघून जाईल. एका गॅसवर पात्रात दीड ते दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

Guava Leaves Tea | agrowon

पाने टाकणे

पाण्याला पहिली उकळी आल्यानंतर, पेरूची पाने हाताने थोडे तोडून पाण्यात टाका. सोबतच किसलेले आलेही टाका. पाणी निम्मे होईपर्यंत हे मिश्रण चांगले उकळू द्या.

Guava Leaves Tea | agrowon

गाळून घेणे

चहा व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळणीने कपामध्ये गाळून घ्या. या कोमट चहामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार थोडे मध किंवा गूळ मिक्स करा. तुमचा औषधी पेरूच्या पानांचा चहा तयार आहे!

Guava Leaves Tea | agrowon

सर्वोत्तम वेळ

हा चहा रोज सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम सकाळीच बूस्ट होते.

Guava Leaves Tea | agrowon

Cat Care Tips : कॅट लव्हर्ससाठी विशेष गाईड! मांजराचा आहार ते लिटर बॉक्स ट्रेनिंग; 'या' गोष्टींकडे देऊ नका दुर्लक्ष

Cat Care Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...