Plant Leaves : फळांपेक्षा पाने जास्त पोषक

Team Agrowon

आंबा, पेरू आणि जांभळाच्या पानांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे या पोषक तत्त्वासोबतच पॉलिफिनॉल, टॅनिन, फ्लेव्हेनॉइड्‍स, अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्‌स हे घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, मधुमेह इत्यादी आजारांवर औषध म्हणून केला जातो.

Medicinal Plant Leaves | Agrowon

वनस्पतीची पाने सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात, हे अन्न फुले येणे, फळे पोसण्यासाठी उपयोगी पडते. पानांतील सर्वच अन्न फळांमध्ये येत नाही, त्यातील काही शिल्लक राहते.

Medicinal Plant Leaves | Agrowon

पाने जुनी होऊन, पिवळे होऊन गळतात. शेतकरी वाळलेल्या पानांचा वापर कंपोस्ट खत, सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करतात. म्हणजेच फळांच्या अन्नाचा मूळ स्रोत पाने आहेत.

Medicinal Plant Leaves | Agrowon

फळझाडांची पाने सावलीत वाळवून किंवा त्याचे अर्क काढून त्यापासून विविध औषधे तयार केली जातात.

Medicinal Plant Leaves | Agrowon

सीताफळ, कढीपत्ता, शेवगा, लिंबूवर्गीय फळझाडे, तसेच करंज, कडुनिंब, विविध भाजीपाल्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत.

Medicinal Plant Leaves | Agrowon

पानांमध्ये फळांपेक्षा अधिक पोषण मूल्ये व औषधी गुणधर्म असतात, पाने वाळवून पावडर तयार करून सर्वसाधारण तापमानात साठविता येते.

Medicinal Plant Leaves | Agrowon

आयुर्वेदिक औषध निर्मितीमध्ये काही प्रमाणात पानांचा वापर केला जातो. आंबा, पेरू आणि जांभळाच्या पानांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे या पोषक तत्त्वासोबतच पॉलिफिनॉल, टॅनिन, फ्लेव्हेनॉइड्‍स, अ‍ॅन्टिऑक्सिडन्ट्‍स हे घटक असतात.

Medicinal Plant Leaves | Agrowon