Anuradha Vipat
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार, दिवाळीसारख्या सणांच्या काळात पैशांचे योग्य व्यवस्थापन ,बचतीची सवय ठेवली तर कधीही पैशांची चणचण भासत नाही.
दिवाळीत अनावश्यक खर्चा टाळून आर्थिक समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी चाणक्य नीतीचे खालील नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
दिवाळी बोनस किंवा पगार हातात येताच हौसमोजीवर खर्च करण्याऐवजी भविष्यातील कठीण काळासाठी गुंतवणूक किंवा बचत करण्याची शिस्त लावा.
सणासुदीत महागड्या वस्तू किंवा महागडे गिफ्ट्स खरेदी करून कर्जबाजारी होण्यापासून तुमचा बचाव करा.
नवीन कौशल्ये आत्मसात करून उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार ठेवल्यास संकटकाळात किंवा सणासुदीत पैशांची कमतरता जाणवत नाही.
दिवाळीत घराची स्वच्छता ठेवणे आणि अन्नाचा अपव्यय टाळणे हे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढवणारे ठरते.
सणांच्या दिवसांत किंवा गुंतवणुकीच्या घाईत कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.