

Pune News : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रासह राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १५) कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट), कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक, मराठवाडा परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर (कृषी) येथे राज्यातील उच्चांकी ३०० मिलिमीटर, तर देवगड येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वैभववाडी येथे ११० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
आज (ता. १५) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
मॉन्सूनची प्रगती होईना
महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल थांबली आहे. मॉन्सूनने २० दिवसांपासून पुढे चाल केलेली नसून, शनिवारी (ता. १४) प्रगतीची सीमा ‘जैसै थे’ होती. वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने दोन ते तीन दिवसांत विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्याच्या काही भागासह पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्यांत तसेच गुजरात राज्यात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.
शनिवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३०.८---२२.४
अहिल्यानगर---३०.८---२३.५
धुळे---४०.०---१९.६
जळगाव---३८.०---२३.५
जेऊर---३२.५---२१.५
कोल्हापूर---२७.९---२३.९
महाबळेश्वर---२३.६---२०.०
मालेगाव---३२.८---२४.०
नाशिक---३०.३---२२.२
निफाड---३४.१---२१.८
सांगली---३०.०---२३.६
सातारा---३२.६---२४.६
सोलापूर---३२.६---२४.६
सांताक्रूझ---३१.२---२७.२
डहाणू---३३.०---२८.०
रत्नागिरी---२९.५---२५.०
छत्रपती संभाजीनगर---३२.०---२४.६
धाराशिव---निरंक---२२.०
परभणी---३३.४---२५.६
परभणी (कृषी)---३३.४---२५.६
अकोला---३८.०---२७.७
अमरावती---३८.६---२७.१
भंडारा---३६.२---२८.०
बुलडाणा---३३.७---२४.८
ब्रह्मपुरी---३८.६---२७.८
चंद्रपूर---३५.४---२५.८
गडचिरोली---३४.४---२५.६
गोंदिया---३८.८---२८.४
नागपूर---३७.८---२७.६
वर्धा---३७.५---२७.५
वाशीम---३३.६---२५.८
यवतमाळ---३७.४---२५.०
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :
रत्नागिरी.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.