Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज (ता.४) १००० ते १००२ हेप्टापास्कल, उद्या (ता.५) १००२ ते १००४ हेप्टापास्कल, तर मंगळवार (ता.६) १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. शुक्रवारी (ता.९) हवेचे दाब १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतका अधिक राहतील. म्हणजेच आज पावसाचा जोर अधिक राहील.
मात्र उद्यापासून हवेच्या दाबात वाढ होतील. शुक्रवारी हवेचे दाब अधिकतम राहतील. त्यामुळे पावसाची उघडीप राहील. या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस पावसाचे प्रमाण अधिक राहील. मात्र मंगळवार (ता. ६) पासून पावसाचे प्रमाण कमी होईल. शुक्रवारी (ता.९) पुन्हा हवेच्या दाबात वाढ होताच पावसाची उघडीप राहील.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागातही आजपासून हवेचे दाब वाढत आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागराची शाखाही कमकुवत होऊन पावसाचे प्रमाण घटेल. या आठवड्याच्या सुरुवातीस वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व बीड, सांगली जिल्ह्यांत ताशी ३० कि.मी., तर जालना, बुलडाणा, वाशीम, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ताशी २५ ते २८ कि.मी. इतका राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैॡतेकडून राहील. हवामान ढगाळ राहील. कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसचा फरक राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी हवामान थंड राहील. आठवड्याच्या सुरुवातीस मध्यम, तर त्यापुढे पावसाचे प्रमाण कमी होत जाण्याची शक्यता राहील.
प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १४ ते २२ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला-निना’चा परिणामाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. हिंदी महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्याचाही फायदा पुढे चांगल्या पावसासाठी अनुकूल राहील.
कोकण
आज व उद्या (ता.४, ५) पालघर जिल्ह्यात ४० ते ५४ मि.मी. रायगड जिल्ह्यात ५० ते ५१ मि.मी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ ते ५७ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ५२ ते ५६ मि.मी. व रत्नागिरी जिल्ह्यात ६० ते ६५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡतेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १६ ते १७ मि.मी., रायगड जिल्ह्यात ताशी २१ कि.मी. आणि ठाणे व पालघर जिल्ह्यांत ताशी २२ कि.मी. राहील. कमाल तापमान रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ९० ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९२ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज व उद्या (ता.४, ५) नाशिक जिल्ह्यात १२ ते २० मि.मी. धुळे जिल्ह्यात १३ ते १८ मि.मी., जळगाव जिल्ह्यात ७ ते १६ मि.मी. व नंदुरबार जिल्ह्यात २६ ते २८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १७ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के राहील.
मराठवाडा
आज व उद्या (ता.४, ५) धाराशिव जिल्ह्यात ५ ते ८ मि.मी., जालना जिल्ह्यात ४ ते ८ मि.मी., परभणी जिल्ह्यात ६ ते ७ मि.मी., बीड जिल्ह्यात ५ ते ६ मि.मी., लातूर जिल्ह्यात ४ ते ९ मि.मी., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात ६ ते १३ मि.मी., तर नांदेड जिल्ह्यात ५ ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी ३० कि.मी., धाराशिव जिल्ह्यात ताशी २८ कि.मी., तर जालना जिल्ह्यात ताशी २५ कि.मी., हिंगोली जिल्ह्यात ताशी २३ कि.मी. राहील. तसेच नांदेड व परभणी जिल्ह्यांत ताशी २२ कि.मी. व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी २१ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. कमाल तापमान हिंगोली व जालना जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज व उद्या (ता.४, ५) बुलडाणा जिल्ह्यात ३ ते १२ मि.मी., अकोला जिल्ह्यात ४ ते १३ मि.मी., वाशीम जिल्ह्यात ५ ते १६ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ७ ते १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला जिल्ह्यात २२ कि.मी. व अमरावती जिल्ह्यात ताशी १८ कि.मी., बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २६ ते २८ कि.मी. राहील. कमाल तापमान अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९२ टक्के राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आज (ता.४) १६ ते १९ मि.मी., तर उद्या (ता.५) ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २४ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर जिल्ह्यात २० मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २२ मि.मी., भंडारा जिल्ह्यात २३ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात आज (ता.४) १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.५) गडचिरोली जिल्ह्यात ११ मि.मी., गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १६ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता.४) सांगली जिल्ह्यात ६ मि.मी., सोलापूर व नगर जिल्ह्यात ८ मि.मी., कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १३ मि.मी. व पुणे जिल्ह्यात १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.५) सांगली जिल्ह्यात ४ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ६ मि.मी, कोल्हापूर जिल्ह्यात १२ मि.मी., सातारा जिल्ह्यात १३ मि.मी, नगर जिल्ह्यात ११ मि.मी. व पुणे जिल्ह्यात १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.
वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व सांगली जिल्ह्यांत २७ ते ३० कि.मी., तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत २४ कि.मी. राहील. कमाल तापमान पुणे, नगर व सातारा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के राहील.
कृषी सल्ला
शेतातील अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
पावसात उघडीप होताच व वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
भात खाचरात पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमी ठेवावी.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.