Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या काळात, तसेच मॉन्सूनने निरोप घेतल्यानंतर तयार झालेल्या वादळी प्रणालींमुळे राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यात राज्यात ७७.७ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ५ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र पावसाचे वितरण असमान असल्याने दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याचे दिसून आले..ऑक्टोबर महिना हा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीचा, तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या (ईशान्य मॉन्सून) सक्रियतेचा असतो. या कालावधीत राज्यात दीर्घकालीन सरासरीनुसार ७४ टक्के पाऊस पडतो. राजस्थानमधून १४ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासावर निघालेल्या पावसाने १६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला. याच वेळी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्ये मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले..यंदाच्या कॅलेंडर वर्षामध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकही चक्रीवादळ तयार झाले नाही. १८९१ पासून ११ वेळा अशी परिस्थिती दिसून आली असून, २०११ आणि २०१२ नंतर यंदा २०२५ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकाही चक्रीवादळीची निर्मिती झालेली नाही. मात्र ऑक्टोबर महिन्यात अरबी समुद्रात ‘शक्ती’ आणि बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ अशी दोन चक्रीवादळे तयार झाली. शिवाय एक वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) आणि एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अशा दोन प्रणाली देखील या महिन्यात तयार झाल्या. या चारही प्रणालींनी देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर महाराष्ट्रात पावसाने सरासरी ओलांडली. कोकण आणि गोवा विभागात सर्वाधिक (५८ टक्के अधिक) पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत कमी (उणे १२ टक्के) पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ऑक्टोबरची सरासरी ओलांडली..Paus Andaj: राज्यात पावसाचा जोर कमी होणार; तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता .ऑक्टोबर महिन्यात राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊसविभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारीकोकण-गोवा---११६.४---१८४.४---अधिक ५८मध्य महाराष्ट्र---७७.९---६८.८---उणे १२मराठवाडा---७४.०---७७.९---अधिक ५विदर्भ---६२.३---५७.८---अधिक ८.देशात ४९ टक्के अधिक पाऊसऑक्टोबर महिन्यात (१ ते ३१ ऑक्टोबर) देशभरात ११२.२ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ४९ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये देशात सरासरी ७५.४ मिलिमीटर पाऊस पडतो. महिनाभराच्या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आसाम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, अंदमान निकोबार बेट समुहावर सरासरी इतका पाऊस झाला. तर लडाखसह ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम या राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले..राज्यात पावसाचे वितरण असमानऑक्टोबर महिन्यात राज्यात जोरदार पाऊस कोसळला असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान असल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. मात्र यंदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे. यातही सोलापूर जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाला असून, या जिल्ह्याच्या पर्जन्यमानात ७४ टक्क्यांची तूट होती. त्यापाठोपाठ अकोल्यात पावसात ६४ टक्क्यांची तूट दिसून आली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी होते. खानदेशातील धुळे (१९६ टक्के अधिक) आणि नंदूरबारमध्ये (१८८ टक्के अधिक) सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला आहे..Maharashtra Weather: नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहणार.राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण :सरासरीच्या तुलनेत खूप अधिक (६० टक्क्यांपेक्षा अधिक) :पालघर, सिंधुदुर्ग, पालघर, नंदूरबार, धुळे, नाशिक.सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :मुंबई शहर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :मुंबई उपनगर, अहिल्यानगर, जळगाव, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा.सरासरीपेक्षा कमी पाऊस (उणे २० ते उणे ५९ टक्के) :पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, धाराशिव, हिंगोली.सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस (उणे ६० ते उणे ९९ टक्के) :सोलापूर, अकोला..ऑक्टोबर महिन्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (सौजन्य - हवामान विभाग) :जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांत)मुंबई शहर---७३.५---१५६.०---अधिक ११२मुंबई उपनगर---८१.२---७२.८---उणे १०पालघर---६१.३---१३३.६---अधिक ११८रायगड---११४.८---१५१.३---अधिक ३२रत्नागिरी---१३३.६---१६०.८---अधिक २०सिंधुदुर्ग---१५२.७---२५२.८---अधिक ६६ठाणे---७३.४---१०४.९---अधिक ४३.अहिल्यानगर---७५.३---६५.६---उणे १६धुळे---३७.०---१०९.६---अधिक १९६जळगाव---४२.५---४९.३---अधिक १६कोल्हापूर---११९.८---८३.१---उणे ३१नंदूरबार---३४.३---९८.८--- अधिक १८८नाशिक---६३.८---११८.५--- अधिक ८६पुणे---८६.४---६७.३---उणे २२सांगली---१०६.२---४८.१---उणे ५५.सातारा---९५.६---४६.५---उणे ५१सोलापूर---१०१.३---२६.२---उणे ७४बीड---७६.२---४६.९---उणे ३८छ. संभाजीनगर---५९.५---८४.६--- अधिक ४२धाराशिव---८५.५---५२.४---उणे ३९हिंगोली---६८.१---४०.१---उणे ४१जालना---६३.९---८८.२---अधिक ३८लातूर---८६.३---१०५.७---अधिक २३नांदेड---७८.०---८९.५---अधिक १५.परभणी---७५.५--११४.६---अधिक ५२अकोला---५४.१---१९.५----उणे ६४अमरावती---५०.४---६३.०---अधिक २५भंडारा---५२.४---७२.५---अधिक ३८बुलडाणा---५५.८---४९.५---उणे ११चंद्रपूर---६५.२---७८.०---अधिक २०गडचिरोली---६६.७---८३.३---अधिक २५गोंदिया---४७.४---६७.४---अधिक ४२नागपूर---५१.७---६६.२---अधिक २८वर्धा---५४.७---४९.१---उणे १०वाशीम---६१.५---५६.४---उणे ८यवतमाळ---६१.६---५४.२---उणे १२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.