कशी कराल हायड्रोपोनिकसाठी बियाणे निवड?

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने गहू, मका यांसारख्या धान्याची वाढ करून चारा निर्मिती करता येते. हायड्रोपोनिक चारा निर्मितीमध्ये बियाण्यांची निवड करताना टपोरे, रोगमुक्त, किमान ८० टक्के उगवण क्षमता असलेले बियाणेच वापरावेत. हे बियाणे चांगले आणि उच्च प्रतीचे असावे.

सर्वप्रथम बियाणे (seed) स्वच्छ पाण्यात दोन वेळा धुऊन घ्यावं. चांगले कोंब येण्यासाठी हे बियाणं १२ ते २४ तास कोमट पाण्यात भिजवून ठेवावं. त्यानंतर हे बियाणं पाण्यातून काढून एका ओल्या गोणपाटात दोन दिवस गुंडाळून ठेवावं. असं केल्यानं दाण्यांना मोड येण्यास मदत होते. वातावरणातील तापमानानुसार गोणपाटामध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी त्यावर पाणी शिंपडत राहावे. कोंब फुटलेल्या दाण्यांवर ५ टक्के मिठाचे द्रावण (salt solution) शिंपडावे. मिठाच्या द्रावणामुळे या ओलसर वातावरणात बुरशीच्या (fungus) वाढीला अटकाव घालता येतो. यासोबतच तुम्ही ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचाही वापर करू शकता.

यासाठी बाजारात उपलब्ध असलेले ट्रे स्वतःच्या सोयीनुसार घ्यावेत. हे ट्रे स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळवून घ्यावेत. यानंतर या ट्रेमध्ये कोंब किंवा मोड आलेल्या दाण्यांचा थर समप्रमाणात पसरवून घ्यावा. आणि मग हे ट्रे तयार केलेल्या शेडमध्ये बांबू किंवा लोखंडाच्या स्टॅडवर ठेवावे. शेडमध्ये आर्द्रता कायम टिकून राहावी म्हणून फॉगर्स किंवा मायक्रोस्प्रिकलरचा वापर करू शकता. फॉगर्सचा वापर केल्यास दिवसातून ५ ते ७ वेळेस २ तासाच्या अंतराने पाणी द्यावे. प्रत्येक वेळेस पाणी देताना ५ मिनिट पाणी द्यावे. पूर्ण २४ तास फॉगर्सचा उपयोग केल्यास वीजपंपाला टायमरचा लावून त्याचा वापर करावा. अशा पद्धतीने ११ ते १२ दिवसात सर्वसाधारण २० ते २५ सेंटीमीटर उंचीचा हिरवा चारा तयार होतो. ट्रेच्या आकारानुसार एका ट्रेमधून जवळपास १० ते १२ किलो हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

आपल्याकडील जनावरांची एकूण संख्या, त्यातही दुधाळ आणि भाकड जनावरांची संख्या त्यानुसार एकूण ट्रेची संख्या ठरवावी.दुधाळ जनावरांना १५ ते २० किलो तर भाकड जनावरांना ६ किलो प्रति जनावर याप्रमाणे हिरव्या चाऱ्याची गरज लागते. ट्रेच्या तळाला छिद्रे करावीत. जेणेकरून पाणी साचून राहणार नाही.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चारा निर्मिती करत असताना, कधीही ज्वारीच्या चाऱ्याचे उत्पादन घेऊ नये. कारण कोवळ्या ज्वारीमध्ये हायड्रोसायनिक असिडचे प्रमाण जास्त असते आणि असा चारा खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com