शेती खरडली, ठिबक, मल्चिंग गेले वाहून

शेती खरडली, ठिबक, मल्चिंग गेले वाहून
शेती खरडली, ठिबक, मल्चिंग गेले वाहून

सिल्लोड, जि. औरंगाबाद : तालुक्‍यातील मादणी ते जळकी बाजार दरम्यान खुपटा, मादणी, दहेगाव आदी गावातील शेतीपिकाचे नदीचे पाणी शेतात घुसल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या संदर्भात कृषी विभागाच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यासह तलाठ्याने प्राथमिक पाहणी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. जवळपास दीडशे हेक्‍टरवरील पीक व शेतीचे पुराने नुकसान केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. २७) रात्री व शुक्रवारी (ता. २८) पाऊस झाला. या पावसामुळे मादणी शिवारातील अजिंठ्याच्या डोंगररांगातून उगम असलेला ओढा व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात रायघोळ नदी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नदीला पूर आला. 

अतिशय छोटे पात्र असलेल्या रायघोळ नदीचे पाणी काठावरील शेतात घुसल्याने मिरची पिकासह, त्यासाठीचे मल्चिंग, ठिबकच्या नळ्या यांचे मोठे नुकसान झाले. खुपटा शिवारातील कापूस २१ हेक्‍टर, मका १९ हेक्‍टर, मिरची ४ हेक्‍टर, खुपटा शिवारातील १४ हेक्‍टर कापूस, २४ हेक्‍टर मका, ३ हेक्‍टर मिरची, धोत्रा शिवारातील ५५ हेक्‍टर कापूस, ४० हेक्‍टर मका, ४ हेक्‍टर मिरची, पानवडोद खुर्द शिवारातील ३२ हेक्‍टर कापूस, ३७ हेक्‍टर मका, अडीच हेक्‍टर मिरची मिळून जवळपास १५६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुरुवारी रात्री गावशिवारातील नदीला आलेल्या पुराने मोठ नुकसान झालं. ठिबक संच बाहून गेला. मिरचीची मल्चिंगही संपली. पीक तर मिळणार नाहीच पण मोठं नुकसान होऊन बसलं.  - गोकूळ बारवाल, शेतकरी, खुपटा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद

इकतचं पाणी टाकून मिरची जगवली. आता मिरची तोडायला आली असती. पण रात्रीतून आलेल्या पुराच्या पाण्यानं सारं संपवलं. आधीचं कर्ज त्यात आता हे नुकसान होऊन बसलं काय करावं काही सुचेना.  - गजानन गोतमारे, शेतकरी, खुपटा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com