Agrowon Podcast : सोयाबीनवरील दबाव कायम

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावावरील दबाव आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही कायम होता.
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावावरील दबाव आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही कायम होता. सोयाबीनचा भाव शुक्रवारी ९.३८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयातेलाचा बाजार ३८.७६ सेंट प्रतिपाऊंवर बंद झाला होता. तर सोयापेंडचा भाव ३०२ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातही सोयाबीनचे भाव नरमले असून ३ हजार ९०० ते ४ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसू भाव नरमले

जागतिक पातळीवर उत्पादन वाढ आणि मागणी कमी राहण्याचा अंदाज असल्याने कापूस बाजारातील मंदी कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६७.२४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. जागतिक बाजारात सध्या कापसाला कमी उठाव असल्याचा हा परिणाम आहे. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ८५० रुपये प्रतिखंडीवर आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Soybean
Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीन, मका, तुरीची लागवड १३ टक्क्यांनी घटली; उत्पादन वाढणार का? 

कांदा दरात काहीशी सुधारणा

कांद्याच्या भावात आजही काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारात कांद्याची आवक मागील तीन दिवसांपासून काहीशी घटली आहे. तर शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदा खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारातही माल कमी येत आहे. परिणामी कांदा भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत. कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच कांद्याची आवक कमी होण्याचीही शक्यता व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.

Soybean
Tur Bajarbhav : आमच्या तुरीला किमान २० टक्के जास्त हमीभाव द्या; कलबुर्गीच्या शेतकऱ्यांची मागणी

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

लसणाचे भाव नरमले

राज्यात लसणाचे भाव नरमले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com