
1. तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायमये. उद्या राज्यात उष्णतेची लाट काहीशी निवळणार असली तरी उन्हाची ताप कायम राहणारे. तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. अकोला येथे गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असून, शनिवारपासून (ता. ९) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय.
2. खुल्या बाजारात हरभरा दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर जास्त विक्री करताना दिसतात. आत्तापर्यंत नाफेडने शेतकऱ्यांकडून ४ लाख २५ हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली. यंदा नाफेडच्या खरेदीचा वेग वाढला आहे. गुजरातमध्ये यंदा उत्पादन वाढले. त्यामुळे नाफेडची खरेदीही येथे सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत २ लाख १३ हजार टन हरभरा खरेदी झाला. तर महाराष्ट्रात १ लाख ७० हजार टन आणि कर्नाटकात ४० हजार टनांची खरेदी झाली.
3. गतवर्षीपेक्षा यंदा चिंचेचे उत्पादन चांगले निघाले. नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला सध्या साधारणपणे दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होतेय. यंदा दर आणि आवक सध्या स्थिर आहेत. चिंचेला ६५०० ते १५ हजार व सरासरी १०७५० रुपये प्रतिक्विटंल दर मिळातोय. गेल्यावर्षी चिंचेला साधारणपणे २१ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. नगरसह शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव व पुणे जिल्ह्यांतील काही भागांत चिंचेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांधावरील पीक म्हणूनही चिंचेकडे पाहिले जाते. उन्हाळ्यात चिंचेतून अनेक महिलांना रोजगारही मिळतो.
4. इंडोनेशियात शेतीमाल पाठवायचा असल्यास भारताला गुणवत्तेचे प्रमाणपत्र देणाऱ्या प्रयोगशाळांकडे पूर्वनोंदणी करावी लागेल. अन्यथा हा कृषी माल स्वीकारला जाणार नाही, असं परिपत्रक इंडोनेशियाच्या कृषी मंत्रालयाने ३ ते ४ महिन्यांपूर्वीच काढले होते. पूर्वीचे नियम २४ मार्चपर्यंतच लागू राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार व्हिएतनाम, थायलंड या देशांनी तत्काळ या नव्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. मात्र भारताकडून या नव्या नियमावलीच्या पूर्ततेसंदर्भात पाऊल उचलण्यास वेळ लागला. भारतानेही ३१ मार्च रोजी नव्या नियमावलीनुसार नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. आता भारतीय प्रयोगशाळांनी नोंदणीसाठी मुदतवाढ मागितली. परंतु इंडोनेशियाच्या प्रशासनाने या निर्णयाची अमलबजावणी करण्यास सुरुवात केलीये. भारतीय दूतावासाकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच यावर तोडगा निघेल, असा विश्वास दूतावासातील सूत्रांनी व्यक्त केलाय.
5. भारत जागतिक पातळीवर सर्वांत मोठा उत्पादक, वापरकर्ता आणि आयातक देश आहे. भारतात यंदा कडधान्याची आयात मोठ्या प्रमाणात झाली. यात तूर आयात आघाडीवरये. त्यानंतर उडदाचा नंबर लोगतो. मगू आणि हरभऱ्याचीही आयात मोठ्या प्रमाणात झाली. देशात कॅनडा, म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकी देशांतून कडधान्य आयात होते. भारतात जशी आयात तशी कडधान्य निर्यातही होते. भारतातून शेजारील देशांमध्ये कडदान्य निर्यात होते. तसेच अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील देशांनाही कडधान्य पाठविले जाते. या देशांत सेंद्रीय कडधान्याची मागणी अधिक असते. त्यामुळे भारतातून निर्यात वाढली. अपेडाने दिलेल्या माहितीनुसार देशातून एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात ३ लाख ४४ हजार टन कडधान्य निर्यात झाली. यातून भारताला २ हजार ३६७ कोटी रुपयांचे परकिय चलन मिळाले. तर याच काळात २०२०-२१ मध्ये केवळ २ लाख ५५ हजार टन कडधान्य निर्यात झाली होती. त्याबदल्यात भारताला १ हजार ८२८ कोटी रुपये मिळाले. म्हणजेच निर्यातीत ८९ हजार टनांनी निर्यात वाढली. तर निर्यातमधून मिळणारे उत्पन्न २९ कोटींनी वाढले. यंदा भारतातून कडधान्य निर्यात वाढली, मात्र हे प्रमाण खुपच कमीये. आयात १५ ते १७ लाख टनांच्या दरम्यान आणि निर्यात मात्र केवळ साडेतीन लाख टनांचीये. त्यामुळे भारताची ओळख आयातदार म्हणूनचये. भारतात यंदा कडधान्याचा अतिरिक्त पुरवठा होण्याची शक्यताये. त्यामुळे निर्यात वाढण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.