Future Rate : मूग, टोमॅटो वगळता सर्व पिकांत घसरण

MCX ने कापसाच्या जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार २९ तारखेपासून बंद केले आहेत. फेब्रुवारीपासूनच्या पुढील व्यवहारांची सुरुवातसुद्धा लांबणीवर टाकली आहे. कापूस करारांच्या तपशीलातील बदल करण्यात येणार आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

MCX ने कापसाच्या जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार २९ तारखेपासून बंद केले आहेत. फेब्रुवारीपासूनच्या पुढील व्यवहारांची सुरुवातसुद्धा लांबणीवर टाकली आहे. कापूस करारांच्या तपशीलातील बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे ही बंदी घातली आहे, असे त्यासंबंधीच्या पत्रकात म्हटले आहे.

१ सप्टेंबरपासून NCDEX मध्ये मक्याचे २० जानेवारी डिलिव्हरीचे व्यवहार सुरू झाले आहेत. तेथे सध्या मक्याचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिव्हरीचे तर हळदीचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. हरभरा, मूग, सोयाबीन व तूर यांच्या फ्यूचर्स व्यवहारांवर अजूनही बंदी आहे.

MCX मध्ये कापसाचे (Cotton Rate) ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी व्यवहार तर कपाशीचे नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल व्यवहार सुरू आहेत. या महिन्यापासून खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) सुरू होईल. पाऊस आतापर्यंत चांगला पडत असल्याने या महिन्यात मागील उत्पादनातील साठा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे किमती कमी होण्याचा प्रवास सुरू होईल. नवीन पिकाची आवक जशी वाढेल तसा किमतीतही उतरता कल दिसून येईल. मात्र पुढील महिन्यात सणांमुळे मागणीसुद्धा यंदा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शासनातर्फे यंदा अधिक खरेदी करण्याची योजना आहे. जर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिरिक्त पाऊस (Excessive Rain) पडला तर किमतीत वाढते चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

२६ ऑगस्ट रोजी संपणाऱ्या सप्ताहात देशात आधीच्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच पिकांची आवक वाढली. यातील विशेष वाढ मका (४६ टक्के), हळद (५९ टक्के), हरभरा (५० टक्के), मूग (९० टक्के) व तूर (४६ टक्के) यांच्यात होती. या सप्ताहात मूग व टोमॅटो वगळता सर्वच पिकांच्या किमती घसरल्या.

Soybean Rate
Tur Rate : तूर खरेदीसाठी वरातीमागून घोडं

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑगस्ट महिन्यात वाढत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४.७ टक्क्यांनी घसरून रु. ४४,८५० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भाव २.१ टक्क्यांनी घसरून रु. ३८,०२० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ३.३ टक्क्यांनी घसरून रु २,२४३ वर आले आहेत. नवीन वर्षासाठी कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. हेजिंगसाठी अनुकूल वेळ आहे.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,५०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती २.१ टक्क्यांनी घसरून रु. २,५१९ वर आल्या. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५४२ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ जाहीर झाला आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मक्याला मागणी चांगली आहे.

Soybean Rate
Soybean Rate: खाद्यतेलाची आयात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,४३९ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती १.५ टक्क्याने वाढून रु. ७,५५२ वर आल्या.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. ४,६४४ वर आल्या. हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,२३० आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) ऑगस्ट महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ९.५ टक्क्यांनी घसरून प्रति क्विंटल रु. ५,५८१ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ५,३५३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ४,३०० आहे.

मूग

मुगाच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढून रु. ६,३१३ वर आली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव प्रति क्विंटल रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. नवीन मुगाची आवक आता बाजारात सुरू झाली आहे. यात कर्नाटक राज्याचा हिस्सा ६५ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (२० टक्के) आहे. महाराष्ट्रातील आवकसुद्धा वाढत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) ऑगस्ट महिन्यात घसरत होती. या सप्ताहात ती ४.७ टक्क्यांनी घसरून रु. ७,१०२ वर आली आहे. नवीन वर्षासाठी हमीभाव प्रति क्विंटल रु. ६,६०० जाहीर झाला आहे.

कांदा

कांद्याच्या किमती ऑगस्ट महिन्यात रु. १,२५० च्या आसपास चढ-उतार अनुभवत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२५० होती. या सप्ताहात ती रु. १,१९४ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहाच्या तुलनेने १४.९ टक्क्यांनी वाढून रु. १,०३४ पर्यंत आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

arun.cqr@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com