Cotton Rate : पांढऱ्या सोन्याची झळाळी यंदाही कायम राहणार

यंदा पाकिस्तानकडूनही कापसाची मागणी वाढण्याची शक्यता
Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणेः देशातील कापूस लागवड (Cotton Cultivation) यंदा जवळपास ९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळं यंदा देशातील कापूस उत्पादन (Cotton Production) वाढेल. मात्र ऑक्टोबर महिन्यात पावसाचं चित्र कसं राहतं यावरून उत्पादनाचं चित्र स्पष्ट होईल, असंही उद्योगाकडून (Textile Industry) सांगितलं जातंय. त्यातच जगात महागाई (Inflation) वाढल्याचा परिणाम कापूस बाजारावर (Cotton Market) होत असल्याच्याही चर्चा आहेत.

भारतात यंदा कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त होत असला तरी निर्यातही वाढेल, अशी शक्यता व्यक्त होतेय. त्याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानधील कापूस उत्पादना झालेली मोठी घट. पाकिस्तानमध्ये सिंध आणि पंजाब ही दोन महत्वाची कापूस उत्पादक राज्ये आहेत. मात्र या दोन्ही राज्यांमध्ये पुरानं थैमान घातलंय. त्यामुळं पाकिस्तानमधील कापूस उत्पादन ४० ते ४५ टक्क्यांनी घटेल, असा अंदाज आहे. सिंध प्रांतातील जवळपास ८० टक्के पिकाचं नुकसान झालं. तर पंजबामधील पिकालाही ६ टक्के फटका बसलाय. हंगामाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये यंदा ११० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र आता उत्पादन ६५ ते ७५ लाख गाठींच्या दरम्यानच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त होतोय.

Cotton Rate
Cotton Seed Technology : दोन वर्षांत नवे कापूस बियाणे तंत्रज्ञान येणार

पाकिस्तानला का हवाय भारतीय कापूस?

पाकिस्तानमध्ये कापड उद्योगाचा विस्तार मोठा आहे. येथील कापड उद्योगाला दरवर्षी १४० लाख गाठींच्या दरम्यान कापसाची गरज असते. म्हणजेच पाकिस्तानला दरवर्षी जवळपास निम्मी गरज आयात करून भागवावी लागेल. यंदा पिकाचं नुकसान झाल्यानं पाकिस्तानला अतिरिक्त ३० लाख गाठींची आयात करावी लागेल, असा अंदाज येथील उद्योगानं व्यक्त केलाय. पाकिस्तानच्या एकूण आयातीपैकी तब्बल ३५ ते ४० टक्के अमेरिकेतून होते. मात्र यंदा अमेरिकेतही कापूस उत्पादन ४७ लाख गाठींनी कमी होणार आहे. तर निर्यातही २६ लाख गाठींनी घटणार आहे.

त्यातच अमेरिकेतील कापसाची विक्री जवळपास पूर्ण होत आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाचे व्यवहार पूर्ण केले. त्यामुळं पाकिस्तानला कापसासाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल. या परिस्थितीत पाकिस्तानला कापूस पुरवठ्याची क्षमता फक्त भारताकडे असेल. बांगलादेश हा भारताचा पारंपरिक कापूस खरेदीदार आहे. भारताच्या एकूण कापूस निर्यातीपैकी तब्बल निम्मा कापूस बांगलादेश खरेदी करत असतो. मात्र यंदा पाकिस्तानकडूनही मागणी येऊ शकते.

Cotton Rate
Cotton Crop Protection : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्या काळजी

पाकिस्तानमधील उद्योग काय म्हणतोय?

पाकिस्तानमध्ये सध्या कापसाची टंचाई जाणवात आहे. सिंध आणि पंजाब प्रांतीतील कापूस आवक सुरु झाली. मात्र पिकाचं नुकसान जास्त असल्यानं आवक जवळपास २० टक्क्यांपर्यंत कमी आहे. त्यामुळं कापसाचे दर तेजीत आहे. परिणामी अनेक सूतगिरण्या आणि कापड उद्योग अद्यापही बंदच आहे किंवा त्यांनी उत्पादन कमी केलंय. कापसाची उपलब्धता वाढल्यास दर काहीसे आटोक्यात येऊन या उद्योगांना उत्पादन सुरु करणं शक्य होईल. मात्र अमेरिकेतूनही जास्त कापूस मिळण्याची शक्यता नाही. भारतात मात्र उत्पादन वाढेल, अशी सध्या चर्चा आहे. त्यामुळं भारतातून कापूस आयात सुरु करावी, अशी मागणी पाकिस्तानमधील सूतगिरण्या आणि कापड उद्योगाने पाकिस्तानी सरकारकडे केली आहे. दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांमुळं सध्या शेतीमाल आयात बंद आहे. ही तातडीने सुरु करावी अशी मागणीही पाकिस्तानी उद्योदानं किली आहे.

सध्याची स्थिती काय?

सध्या जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक स्थिती चांगली नाही. अमेरिकेसह युरोप आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्था महागाईला तोंड देत आहेत. त्यामुळं गारमेंट म्हणजेच कपड्यांची मागणी कमी झाली. परिणामी कापड उद्योगाकडे मालाचा साठा वाढलाय. त्यामुळं सूत आणि कापसाला उठाव कमी दिसतोय. मात्र पुढील महिना दोन महिन्यांमध्ये ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सणांच्या काळात कपड्यांना मागणी वाढून कापसालाही उठाव मिळेल.

दराची पातळी काय राहू शकते?

देशात यंदा कापसाचं क्षेत्र वाढल्यानं उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र पाकिस्तानसह इतर देशांकडून मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं ऑक्टोबरमध्ये आवक वाढल्यानंतर कापूस काहीसा दबावात आला तरी नोव्हेंबरपासून दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कापसाला यंदा किमान ८ हजार ५०० ते १० हजार रुपयांदरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस एकदम न विकता टप्प्यांमध्ये विकल्यास फायदेशीर राहील, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

देशात सध्या कापासाची आवक वाढतेय. सध्या कापसाला ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळतोय. मात्र यंदाही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचं नियोजन करणं गरजेच आहे. उत्तर भारतातील बाजारात कापसाची आवक वाढत आहे. सध्या पिकाची स्थितीही चांगली दिसते. मात्र ऑक्टोबरमधील पावसाचं प्रमाण कसं राहतं यावर उत्पादन स्पष्ट होईल. ऑक्टोबरमध्ये आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येऊ शकतात. मात्र नोव्हेंबरमध्ये दरात सुधारणा होऊ शकते.
महेश शारदा, माजी अध्यक्ष, नाॅर्थ इंडिया काॅटन असोसिएशन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com