Cotton Industry : जिनिंगचा हंगाम लांबला

Cotton Production : अपेक्षित भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी विक्रीविना ठेवलेल्या कापूस अजूनही भागनिहाय १० ते ३० टक्क्यांपर्यंत शिल्लक आहे.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Cotton Market Update : अपेक्षित भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी विक्रीविना ठेवलेल्या कापूस अजूनही भागनिहाय १० ते ३० टक्क्यांपर्यंत शिल्लक आहे. यापैकी बराच कापूस आता पुढील हंगामात विकावा लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मार्च, एप्रिलपर्यंत चालणारा जिनिंगचा हंगामाही लांबल्याने अजूनही वीस ते पंचवीस टक्के जिनिंग मिल सुरूच असल्याची स्थिती आहे.

कपाशी ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे. अनेक पिके आली गेली, परंतु कपाशीचे पीक शेतकऱ्यांनी सोडलेले दिसत नाही. गतवर्षीच्या खरीप हंगामात मराठवाड्यात १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८८ टक्के लागवड झालेल्या या क्षेत्राच्या तुलनेत यंदा १३ लाख ९१ हजार २७९ हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे.

Cotton
New Textile Policy : नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर

सुरुवातीला साडेआठ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले कापसाचे दर नंतर मात्र कमी होणे सुरू झाले ते आजतागायत वधारलेच नाहीत. आत्ताच्या घडीला चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर फरदडच्या कापसाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात कापूस विक्रीसाठी बाहेर काढलाच नाही.

साधारणतः फेब्रुवारी मार्चनंतर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढणे सुरू केल्याने ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत जिनिंग केला जाणारा कापूस आता जुलै उजाडला तरी जिनिंग करणे सुरू असल्याची स्थिती आहे. जिनिंग मिल सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ७०० ते ८०० जिनिंग मिलपैकी जवळपास अडीचशे ते पावणेतीनशे जिनिंग मिल मराठवाड्यात आहेत. ज्या जिनिंग मिल यंदाच्या हंगामात कापूस जिनिंग करीत होत्या, त्यापैकी २० ते २५ टक्के जिनिंग अजूनही सुरू आहेत.

Cotton
Cotton Mulching : साडेसातशे हेक्टरमध्ये मल्चिंगवर कपाशी

मराठवाड्यातील काही भागांतील जिनिंगला यंदा गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्के अधिक कापसाला जिनिंग करणे शक्य झाले तर अनेक जिनिंग मिल्सना अपेक्षित क्षमतेनुसार कापसावर जिनिंग करणे शक्य झाले झाले नाही. ऑक्टोबर ते मार्च या हंगामात केवळ २० ते ३० टक्के कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर काढला होता. जवळपास ७० ते ८० टक्के कापूस दाबून ठेवला होता.

त्यामुळे अपेक्षित कापूस जिनिंगसाठी मिळालाच नाही ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धाग्याला नसलेला उठाव, स्टॉकिस्टही अपेक्षेप्रमाणे पुढे न येणे, सरकी तेलाचे दर घसरणे, पर्यायामुळे सरकी पेंडलाही नसलेली अपेक्षित मागणी, सरकीला नसलेली मागणी यामुळे अजूनही जीनर्सकडे गाठी, तर सूतगिरणी वाल्यांकडे धागा पडून असल्याच सूत्रांचे म्हणणे आहे. बीड जिल्ह्यात साधारणतः ४० ते ४२ जिनिंग आहेत त्यापैकी २० ते २५ यंदाच्या हंगामात सुरू होत्या. त्या यंदा क्षमतेनुसार कापसावर प्रक्रिया करूच शकल्या नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिनिंग मिलवाल्यांकडे गाठी पडून असून सूतगिरणीवाल्यांकडे धागा पडून आहे. निर्यातीला प्रोत्साहन दिल्याशिवाय कापसाचे दर सुधारण्याची शक्यता दिसत नाही.
- अजय सोमाणी, जिनिंग मिल, बालानगर, जि. छत्रपती संभाजीनगर
बीड जिल्ह्यातील दहा टक्के जिनिंग अजूनही सुरू आहेत. यंदा उत्पादन जास्त असले तरी कापूस विक्रीसाठी बाहेर न आल्याने, क्षमतेनुसार कापसावर प्रक्रिया करणे शक्य झाले नाही. शिवाय कापसाच्या दरातील आजवरच्या चढ-उतार अनाकलनीय असेच राहिले.
- बी. बी. जाधव, जिनिंग मिल, जि. बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com