
नवी दिल्ली ः भारताने गव्हाच्या निर्यातीवर (Wheat Export Ban) निर्बंध घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाश्चिमात्य देशांना इशारा दिला आहे. कोरोना लशीप्रमाणे गव्हाचा तुटवडा (Wheat Shortage) पडू नये. नाहीतर अन्नधान्याच्या किमतींमध्ये (Foodgrain Price) प्रचंड वाढ होऊ शकते. अन्नधान्याची साठेबाजी (Stock Hoarding) केली जात आहे. त्यामुळे किमती वाढत आहेत. ते रोखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जागतिक अन्न असुरक्षिततेवर चिंता व्यक्त करण्यात आली.
भारताने १३ मे रोजी गहू निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. त्यावर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करण्यात आली. जागतिक बाजारात गव्हाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. आमची अन्न सुरक्षा आणि आमच्या शेजारी व इतर असुरक्षित देशांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. अन्नसुरक्षेवरील परिणाम कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, आमच्या देशातील अन्नसुरक्षेसाठी आम्ही गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, असे मुरलीधरन म्हणाले.
शेजारील आणि अन्य विकसनशील देशांच्या अन्न पूर्ततेसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. अशा उपाययोजनांमुळे त्यांच्या अन्नधान्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या देशांना मंजुरीच्या आधारावर निर्यात करण्याची परवानगी मिळते. हे संबंधित सरकारांच्या विनंतीनुसार केले जाईल. अशा धोरणामुळे आम्ही खरोखरच प्रतिसाद देऊ शकतो, असेही मुरलीधरन म्हणाले. समानता राखून, सहानुभूती दाखवून आणि सामाजिक न्यायाला चालना देऊन जागतिक अन्न सुरक्षा वाढवण्यात भारत आपली योग्य भूमिका बजावेल, असे मुरलीधरन यांनी ट्विट करून सांगितले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.