Anuradha Vipat
पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनास मदत करणारे पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यामध्ये मूग, मसूर, हरभरा यांसारखी कडधान्ये खावीत
पावसाळ्यामध्ये आले, लसूण, हळद, मिरे, हिंग यांसारखे मसाले रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यामुळे आहारात यांचा समावेश करावा.
पावसाळ्यामध्ये गरम पाणी, हर्बल टी, आले-पुदिना यांसारखी पेये मिक्स करून प्यावीत.
पावसाळ्यामध्ये पालक, मेथी, टोमॅटो, वांगी, भोपळा, भेंडी, पडवळ यांसारख्या भाज्या खाव्यात.
पावसाळ्यामध्ये सफरचंद, डाळिंब, पेरू, लिची, जांभूळ यांसारखी हंगामी फळे खावीत.
पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरील तसेच अस्वच्छ ठिकाणी बनवलेले पदार्थ खाणे टाळावे.