Team Agrowon
स्वत:ची काजूची बाग नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील ओझेवाडी गावच्या अभय नागणे या तरूणाने यशस्वी काजू प्रक्रिया उद्योग उभारला आहे.
एमबीएचं शिक्षण सुरू असताना अभय यांना काजू प्रक्रियेचा लघू प्रकल्प करण्याची संधी मिळाली.
२०१९ च्या दरम्यान पंढरपुरात छोटा काजू प्रक्रिया उद्योगही पाहण्यात आल्यानंतर आपणही हा उद्योग सुरू करावा, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली.
कोरोना काळात मिळालेल्या वेळात काजू प्रक्रिया उद्योगातील बारकावे समजून घेतले. तसेच त्यासाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्राची माहिती जाणून घेतली.
काजू प्रक्रिया उद्योगासाठी कच्च्या मालाची उपलब्धतेचे मोठे आव्हान असते. यासाठी कोकणासह मंगळूर आणि अन्य भागांतील व्यापाऱ्यांकडू कच्चा माल उपलब्ध केला जातो.
काजू प्रक्रियेसाठी अधिकाधिक ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये काजू बी स्वच्छ करण्यासह बॉयलर, स्टिमर, कटर, ड्रायर, साल काढणारे यंत्र अशा यंत्रांचा समावेश आहे.
२०२१ मध्ये प्रति दिन २०० किलो काजूवर होणारी प्रक्रिया आजघडीला एक टनांवर पोहोचली आहे.