sandeep Shirguppe
केळात शरीराला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असतं.
गोड, पिवळ्या रंगाची देशी केळी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.
केळामध्ये पेक्टीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आतड्यांच्या आजारापासून आराम मिळतो.
केळामध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं.
जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन शरिरातील अॅसिड निर्मीती करण्यासाठी केळी उपयुक्त ठरतील.
केळात पोटॅशियम असतं. यामुळे हृदयाचं काम सुधारतं. शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राहतं.
रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे.
केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.