Team Agrowon
संवाद साधण्याचं सगळ्यात सोप आणि चांगल माध्यम म्हणजे फोटो. एक फोटो १००० शब्द बोलतो असं म्हणलं जात. आज आंतरराष्ट्रीय फोटो दिवस आहे.
1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील फोटोग्राफर केविन कार्टरने सुदानमधील दुष्काळाचे फोटे घेतलं होतं. दुष्काळातील भयावह दृश्य सांगणार तो फोटो होता. ज्यावर अनेक वेगवेगळ्या टिकादेखील झाल्या.
1946 मध्ये LIFE मासिकाच्या पहिल्या महिला छायाचित्रकार मार्गारेट बोर्के-व्हाइट यांना महात्मा गांधींचे छायाचित्र काढण्याची दुर्मिळ संधी देण्यात आली. याचा पुरस्कार मिळाला नसला तरी हा फोटो नेहमीच लक्षात राहण्याासारखा आहे.
22 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्लीमधील एका स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी अनेक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात होते, त्यावेळी दानिश सिद्दीकी यांनी आपल्या कॅमेऱ्यातून हा फोटो काढला होता ज्याला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.
लॉस एंजेलिस टाईम्सचे परदेशी वार्ताहर आणि छायाचित्रकार मार्कस याम 2022 चा पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांनी अफगाणिस्तानच्या तालिबानच्या युद्धावेळीचे वास्तव सांगणारे क्षण फोटो मध्ये घेतला होता
छायाचित्रकार निक उट यांनी 1972 च्या व्हिएतनाम युद्धाच्या इतिहासातील सर्वात त्रासदायक क्षणामधला हा एक फोटो कॅप्चर केला. ज्याला पुरस्कार देण्यात आला होता.
व्हिएतनाममध्ये ऑपरेशन पिरान्हा हल्ल्यापासून वाचण्यासाठी दक्षिण व्हिएतनामी आई नदी ओलांडून पोहण्याचा प्रयत्न केला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर फोटोग्राफरने फोटोमधील कुटुंबांचा शोध घेतला आणि त्यांना बक्षिसाची अर्धी रक्कम दिली.