Team Agrowon
राज्यातील शिंदे सरकारने जलयुक्त शिवार योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्यय जलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे.
शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनी १८ मेपासून जलयुक्त शिवार योजना सुरू झाल्याची घोषणा केली.
योजनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन मशिनला डिझेल परतावा मिळणार आहे, असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.
योजनेच्या अंतर्गत विविध जलस्रोतांचे बळकटीकरण करून यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान टप्पा एक मध्ये केलेल्या कामांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यात येणार आहे.
तसेच नवीन कामे लोकसहभागातून करून हे अभियान व्यापक स्वरूपात यशस्वी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत गाळमुक्त धरण अभियानाची व्यापक अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.