Anuradha Vipat
हिवाळ्यातील थंडीमुळे शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. थंडीचा परिणाम केवळ त्वचेवरच नाही तर संपूर्ण शरीरावर होतो.
हिवाळ्यात हवा कोरडी असते, ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते.
ओठांची त्वचा नाजूक असल्याने ती लवकर कोरडी पडून फाटते.
कोरड्या हवामानाचा परिणाम केसांवरही होतो. केस निर्जीव होतात, डोक्यातील कोंडा वाढतो.
थंडीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि सर्दी, खोकला, आणि व्हायरल फ्लूचे विषाणू वेगाने पसरतात.
जुनाट सांधेदुखी असलेल्या व्यक्तींना थंडीत सांध्यांमध्ये जास्त वेदना आणि कडकपणा जाणवतो.
थंडीच्या दिवसात नियमित व्यायाम करा, ज्यामुळे शरीराचे तापमान आणि रक्त परिसंचरण चांगले राहते.