Tomato Rate : टोमॅटोच्या दरात घसरण का झाली?

Team Agrowon

खर्च निघून येईल, अशी आशा मनात असतानाच दिवाळीनंतर मार्केट डाउन झाले.

Tomato Rate | Agrowon

मागील वर्षी आधीच संपलेला बेंगळुरूचा टोमॅटो हंगाम (Tomato Season) या वर्षी नेमका आताच सुरू झाला आहे.

Tomato Rate | Agrowon

देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार, निर्यातदार कर्नाटककडे वळले असल्यानेही उतरण झाली आहे. तरी टोमॅटोचे सध्याचे दर स्थिर राहतील, अशी स्थिती आहे.

Tomato Rate | Agrowon

मॅटो उत्पादकांना प्रति क्रेट ५०० ते ८०० रुपये दर मिळत असल्याने त्यातही दिलासा होता.

Tomato Rate | Agrowon

मागील पाच दिवसांपासून या तेजीलाही ग्रहण लागले आहे. टोमॅटोचे दर प्रति क्रेट कमाल ८०० वरून ४०० पर्यंत, म्हणजे निम्म्याने खाली आले आहेत.

Tomato Rate | Agrowon

बंगळूरचा नुकताच सुरू झालेला हंगाम, तसेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापाऱ्यांकडून सांगितली जात आहेत.

Tomato Rate | Agrowon

मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील टोमॅटो उत्पादक पट्ट्याचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते.

Tomato Rate | Agrowon

यामुळे बंगळूर हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. परिणामी, टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले.

Tomato Rate | Agrowon

मागील वर्षीचा धडा घेऊन बंगळूर भागातील उत्पादकांनी लागवड उशिरा केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते दोन महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.

Tomato Rate | Agrowon
cta image | Agrowon
click here