Sanjana Hebbalkar
आज संपूर्ण देशभर राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा केला जातो. २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन 2012 पासून साजरा केला जातो.
हॉकी खेळात माहीर असणारे आणि भारताचं नाव इतिहासात नोंदवणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो
29 ऑगस्ट च्या दिनी मेजर ध्यानंचंद यांचा जन्म झाला होता. त्यांनी हॉकी खेळात प्रभुत्व मिळवले होते आणि म्हणून त्याला हॉकी विझार्ड आणि द मॅजिशियन या नावांनी संबोधले जायचं.
भारताने 1928, 1932 आणि 1936 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. हे पदक जिंकून देण्यासाठी यासाठी मेजर ध्यानचंद याचं कार्य उल्लेखनीय होतं.
मेजर ध्यानचंद यांनी 1922 ते 1926 दरम्यान त्यांनी अनेक आर्मी हॉकी स्पर्धा आणि रेजिमेंटल खेळांमध्ये भाग घेतला.
राष्ट्राच्या क्रीडा नायकांना देखील त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कृत केले जाते आणि खेळाडूंच्या सन्मानार्थ अनेक पुरस्कार दिले जातात.
खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी एकूण सहा वेगवेगळे पुरस्कार दिले जातात.