Team Agrowon
कोवळ्या स्वरूपामध्ये तोडणी केल्यास या पालेभाजीचे बहुतांश सर्व भाग हे खाद्य उपयोगी आहेत.
या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त ठरते.
तंतुमय पदार्थांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी पाणपालक ची भाजी उपयुक्त ठरते.
सामान्यतः पडीक राहणाऱ्या पाणथळ जमिनीत या पालेभाजीची वाढ चांगल्या प्रकारे होते.
या पालेभाजीची पाने खुडून घेत गेल्यास एकापेक्षा जास्त वेळा उत्पादन हाती येते. तसेच ते वर्षभर घेता येते.
पानपालक मानवी आहारासाठी चांगले आहेच, पण त्याचा वापर हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपातही जनावरांसाठी करता येतो.
सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने उत्पादनासाठी पानपालक उपयोगी ठरू शकते.