Team Agrowon
तुतीची एकदा लागवड केली की पंधरा वर्षांपर्यंत टिकते. पुनर्लागवडीचा खर्च कमी.
बेभरवशाचे हवामान व शेतमालाचे दर यांच्या पेक्षा रेशीम शेती वाटते शाश्वत. नेटके व्यवस्थापन, हवामान व अनुकूल दर मिळाल्यास प्रति बॅच अगदी पन्नासहजारांच्या दरम्यानही उत्पन्न देण्याची क्षमता
झाड वर्षाचे झाले व उन्हाळ्यात दोन- अडीच महिने पाणी अल्प मिळाले तरी ते तगते. त्यानंतर पुन्हा पाऊस पडल्यास उभारी घेते. पाल्याचा पुरवठा किटकांसाठी सुरू राहतो.
अळ्यांनी खावून उरलेला पाला, फांद्या जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात. रेशीम तंत्रज्ञान, प्रशिक्षण व अंडीपूंज यांची सहज उपलब्धता
उत्पादन खर्चाच्या तुलनेत रेशीम कोषांना दर चांगले. त्यामुळे नफा वाढतो.