Gold Rate : सोने, चांदीच्या दरात वाढ का होत आहे? अमेरिका कारण आहे का?

sandeep Shirguppe

सोन्या चांदीचे दर

मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान सोन्याचा दर ७५ हजारांच्या घरात गेला तर चांदी ९५ हजारांवर पोहोचली आहे.

Gold Rate | agrowon

इराण अध्यक्षांचा मृत्यू

इराणच्या अध्यक्षांच्या मृत्यूमुळे मध्य-पूर्वी आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झालीय याने सोने चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे कारण समोर येत आहे.

Gold Rate | agrowon

तज्ज्ञांचा दावा

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, जगात अनिश्चितता वाढली की सोन्याचे भाव वाढतात. कारण, गुंतवणूकदार सर्वात आधी सोन्याला पसंती देतात.

Gold Rate | agrowon

सोने चांदी किंमत

सोने आणि चांदीच्या किंमती वाढल्या आहेत, पण इंधानाच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे.

Gold Rate | agrowon

दिल्लीत सोने दर

राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या भाव ७४ हजार ४११ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा भाव ९३ हजार २१५ रुपये किलो इतका आहे.

Gold Rate | agrowon

अमेरिकेतील चलन वाढ

सोन्यातील किंमतीच्या वाढीमधील आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेतील चलनवाढीमधील नरमाई असेही बोलले जात आहे.

Gold Rate | agrowon

फेडरल बँक

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याज दरात घट करण्याचे सूतोवाच केले आहेत.

Gold Rate | agrowon

गुंतवणुकदार सोन्याकडे कलले

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये दरात घट करण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यावर दाव खेळला आहे.

Gold Rate | agrowon