Team Agrowon
वाढता उन्हाचा तडाखा आणि सोबत रमजान महिना सुरू असल्याने सध्या बाजारात फळांना विशेष मागणी आहे. त्यातही कलिंगड, पपई आणि टरबूज या फळांबरोबर आंब्याला मोठी मागणी आहे.
मुंबईच्या घाऊक बाजारात दररोज ५० फळ गाड्यांची आवक होत असल्याने बाजारालाही उठाव आल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात जागोजागी फळांचे रस, फळांचे सॅलड यांच्या गाड्या लागलेल्या दिसतात. घरी खाण्यासाठीही लोक फळांची खरेदी आवर्जून करतात.
सध्या बाजारात फळांना मागणी वाढली आहे. मात्र, तरीही फळांच्या किमती मात्र स्थिर आहेत. बाजारात फळांना चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
फळे नाशवंत असल्याने उन्हाळ्यात ती लवकर खराब होतात. त्यामुळे ती जास्त वेळ साठवून ठेवता येत नाहीत.
रमजान महिन्यातील रोजे सोडण्यासाठी बहुतांश लोक फळांचे सेवन करतात. त्यामुळे या रसदार फळांना मोठी मागणी आहे.
म्हणूनच कलिंगड, पपई, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
तापमान वाढल्याने फळांच्या रस पिण्यालाही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे लिंबू पाणी, उसाच्या रसाला, कलिंगड-मोसंबीच्या रसाची मागणी वाढली आहे.