Sanjana Hebbalkar
शिक्षक आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या जडणघडणीमधील महत्त्वाचा वाटा म्हणजे शिक्षक होय.
असेच एक शिक्षक भारताला लाभले होते ते म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण. त्यांनी भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदी भूमिका बजावली आहे
याशिवाय ४० वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्याचं कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
१९६२ पासून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी राष्ट्रपती पदावर असताना देखील उत्तम काम केलं आहे
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक दिन महत्त्वाचा मानला जातो. कारण शिक्षक हाच त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मार्गदर्शक असतो
त्यामुळे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे कष्ट करतात. त्यांच्या मेहनतीसाठी आभार मानण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन साजरा केला जातो
भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असला तरी ५ ऑक्टोंबर हा आतंरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो