Anuradha Vipat
गणपतीचे वाहन उंदीर हे गणपती आणि एका उंदराच्या लढाईतून बनले आहे
गणपतीने एका राक्षसी उंदराला पकडून त्याचे वाहन बनवले.
गणपतीने फास फेकून उंदराला पकडले, तेव्हा त्याने क्षमा मागितली
पौराणिक कथेनुसार एकदा एका महाकाय उंदराने ऋषी आणि देवांना त्रास द्यायला सुरुवात केली होती.
या उंदराच्या त्रासामुळे ऋषी गणपतीकडे गेले आणि त्यांना मदत मागितली
त्यावेळी गणपतीने उंदराला धडा शिकवण्यासाठी फास फेकला आणि त्यात तो उंदीर अडकला.
फासात अडकलेला उंदीर गणपतीला शरण गेला आणि त्याने गणपतीची क्षमा मागितली. त्यानंतर गणपतीने त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले.