Team Agrowon
शेतकऱ्यांकडील अपरिपक्व सोयाबीन जर बियाणे निर्मिती कंपन्यांनी पकडले असेल तर पुन्हा बोगस बियाणे पेरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.
घरगुती बियाणांचा गेल्या वर्षातील अनुभव असे सांगतो की, विविध कंपन्यांच्या बियाणांपेक्षा घरगुती बियाणांने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती.
यावर्षी देखील घरगुती बियाणे जतन करणे आणि तेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याची मोहीम शेतकऱ्यांना राबवावी लागणार आहे.
अनेक शेतकऱ्यांनी रब्बी आणि उन्हाळ हंगामात सोयाबीनची पेरणी केली आहे.
या दोन्ही हंगामात मिळणारे उत्पादित खरीप हंगामात बियाणे म्हणून वापरता येईल.
फेब्रुवारी-मार्च-एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे-उष्णतेमुळे सोयाबीन पिकांवर बराच परिणाम होत आहे. त्यामुळे या उत्पादनातून मिळालेले सोयाबीन किती दर्जेदार असेल? ही देखील शंका आहे.