Team Agrowon
नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. भारतीय संस्कृतीत नृत्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
किंबहुना भारतीय संस्कृतीचे ते एक अविभाज्य अंग आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
विविध प्रकारच्या, वैशिष्ट्यपूर्ण अशा सात शास्त्रीय नृत्यपरंपरा अस्तित्वात असलेला भारत हा जगातील एकमेव देश म्हणता येईल.
शास्त्रीय नृत्याप्रमाणेच येथील प्रदेशिक विविधतेनुसार अनेक प्रकार
नृत्यातील भावनेप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव बदलाच्या बारीक रेखीव आणि सुरेख छटा पद्धतीने माने यांनी पकडल्या आहेत.
ए बी माने यांनी टिपलेली काही अप्रतिम फोटो.