Team Agrowon
गावात उतरले की भैरोबा मंदिरापर्यंत मुलाबाळांसोबत पायी सवारी निघायची.
उतरल्या उतरल्याच हॉटेलात भजी किंवा भेळ खायला घालून मामा मुलांना खूश करत असत.
सुट्टीत करायच्या मज्जेची ही जणू सुरुवात होती.
एक, दोन आण्यांना मिळणारी भजी, भेळ, मावा, गुडीशेव, मिसळ, उसाचा रस यामुळे मुलांनी वर्षभर हजर राहिलेली शाळा एका मिनिटात विसरायला व्हायची.
चावडीजवळच आवळा, बोर, अंजीर, पेरू, केळी विकायला असत.
ज्यांची वाडी-वस्ती लांब अंतरावर आहे तिथपर्यंत चालायचा त्रास नको म्हणून बैलगाडी जुंपून आणलेली असे.