Anuradha Vipat
जेव्हा तुमचे हात जास्त वेळ पाण्यात बुडलेले असतात, तेव्हा तुमची स्वायत्त मज्जासंस्था सक्रिय होते.
हा मेंदू बोटांच्या टोकांवरील रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा संदेश देतो.
रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे त्या भागातील रक्ताचा प्रवाह आणि ऊतींचे आकारमान कमी होते.
आतील भाग आकुंचन पावल्यामुळे वरची त्वचा सैल होते आणि तिला सुरकुत्या किंवा वळ्या पडतात
ही प्रक्रिया मानवी उत्क्रांतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
बोटांवर पडलेल्या सुरकुत्यांमुळे ओल्या वस्तू आणि पृष्ठभागावरून पाणी बाहेर निघून जाण्यास रस्ता मिळतो.
बोटे सुरकुतणे हा त्वचेचा कोणताही आजार किंवा दोष नाही.