Bail Pola : बैलपोळ्याचा सण नेमका का साजरा केला जातो?

Swapnil Shinde

पिठोरी अमावस्या

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा करण्यात येतो.

Bail Pola | Agrowon

विदर्भ-मराठवाड्यात सण

श्रावण अमावास्या या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी उत्साहात पोळा साजरा करतात.

Bail Pola | Agrowon

बैलांप्रती कृतज्ञता

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण यंदा गुरुवार दि. १४ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.

Bail Pola | Agrowon

शेती कामांपासून आराम

पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो.

Bail Pola | Agrowon

पूजा व नैवेद्य

पोळा सणाच्या दिवशी बैलांला अंंघोळ घालून सजवून गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो.

Bail Pola | Agrowon

मिरवणूक

बैल सजवून त्यांची मिरवणुकीत काढली जाते.

Bail Pola | Agrowon

मातीच्या बैलाची पूजा

ज्यांचेकडे शेती आणि बैल नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

Bail Pola | Agrowon
gautami-patil | Agrowon