डॉ. सोमिनाथ घोळवे
मांसाहाराला ग्रामीण भागात खूपच महत्त्व. त्यात शेळी-मेंढीचे मटणाचा मांसाहार हा सर्व उत्कृष्ट आणि प्रथिनयुक्त असलेला आहे.
पण शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील शेळी-मेंढीचे मटण 750 ते 800 रुपये किलो झाले आहे. परिणामी हळूहळू मांसाहार खूपच कमी झाला आहे.
गरीबाच्या कुटुंबात तरी स्वतः विकत घेऊन खाण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. जागरण गोंधळ, यात्रा-उरुस, नवसाचे बोकड कापले तर पाहुणचार म्हणून किंवा अतिमहत्वाचे पाहुणे घरी आले तरच शेळी-मेंढीचे मटण पाहुणचार म्हणून आणले जाते.
सर्व्हे करून शेळी-मेंढीचे मटण सण-उत्सव-यात्रा वगळून गेल्या सहा महिन्यात कितीवेळा घरी विकत घेऊन खाण्यात आले असा प्रश्न विचारला तर 50 ते 60 टक्के कुटुंबातून या प्रश्नाचे उत्तर सहा महिन्यापूर्वी किंवा महाग असल्याने खाणे खूपच विरळ झाले आहे असे उत्तर मिळेल.
सीमांत शेतकरी, गरीब,मजुरी करणारे (तळागाळातील) कुटुंबे हे बॉयरल कोंबडीच्या मटण घेण्याकडे वळले आहेत. दुसरे, गावरान कोंबड्या ग्रामीण भागात अपवाद वगळता सापडत नाहीत.
बालाघाट परिसरात काही कुटुंबाने गावरान कोंबड्या जतन केल्या आहेत, मात्र त्यांचे जिवंत कोंबडी-कोंबड्याचे दर 600 रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. पण विक्रीसाठी उपलब्ध नाही असेच चित्र.