Agriculture Tourism : शेती पर्यटनला का देतात शेतकरी पसंती ?

Team Agrowon

रविकांत तूपकर यांनी सह्याद्री कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली.

Agriculture Tourism | Agrowon

रम्य निसर्गाच्या सान्निध्यात, रानपाखरांच्या आवाजात मनाला शांतता व प्रसन्नता देणारे असे इथले वातावरण आल्हाददायक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Agriculture Tourism | Agrowon

अमोल व पवन साठे बंधूनी नऊ वर्षांच्या अथक मेहनतीतून या कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना आपल्या १७ एकरांत प्रत्यक्षात आणली आहे.

Agriculture Tourism | Agrowon

खामगाव-चिखली मार्गावर मुख्य रस्त्यालगत त्यांचे शेत आहे, ज्यात हे कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्याची संकल्पना ते राबवत आहेत.

Agriculture Tourism | Agrowon

बुलढाणेकरांना कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने येथे निसर्गाची जोपासना केली गेली आहे.

Agriculture Tourism | Agrowon

सुंदर वातावरण, राहण्यासाठी सुसज्ज रुम्स, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, गावरान पद्धतीचे जेवण, डेस्टिनेशन वेडिंगची सोय, 'कराओके' संगीत मैफल', पक्षी निरिक्षण, बैलगाडीची सफर, रोप क्लाईंबिंग, अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण असा हा प्रकल्प आहे.

Agriculture Tourism | Agrowon

या केंद्रात किल्ला प्रतिकृती, त्याचे निरीक्षण, शिवकालीन शस्त्रास्त्रे व प्रात्यक्षिकेही तसेच ग्रामीण जीवनातील वस्तू पाहता येतात.

Agriculture Tourism | Agrowon
Agriculture Tourism | Agrowon