Grape Market : द्राक्षाचे भाव का वाढले नाहीत?

Team Agrowon

जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील द्राक्षाच्या आगारातील द्राक्षाच्या दरात वाढ नसल्याचीच स्थिती आहे.

Grape Market | Agrowon

ग्राहकांना लागणारे दर व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणारे दर यात मोठी तफावत दिसत आहे. शिवाय वातावरणाची प्रतिकूलता शेतकऱ्यांना आपले द्राक्ष मिळतील त्या भावात विक्री करावी लावत असल्याचे चित्र आहे.

Grape Market | Agrowon

आधी थंडीमुळे द्राक्षाला उठाव नव्हता. महाशिवरात्री आधी ३५ ते ४० रुपयांपर्यंत असणारे द्राक्षाचे प्रती किलोचे दर घडीला २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले होते.

Grape Market | Agrowon

आता ते १५ रुपयांपासून ३० रुपयांच्या आतच प्रति किलोपर्यंत खाली उतरले असल्याचे शेतकरी सांगतात.

Grape Market | Agrowon

जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे.

Grape Market | Agrowon

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा, दरकवाडी, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे.

Grape Market | Agrowon
Jowar Harvesting | Agrowon