Team Agrowon
तिळाचा हंगाम संपला असतानाही दरवाढीच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तिळाची साठवणूक केली होती. या शेतकऱ्यांकडून बाजारात तीळ आणला जात आहे.
आवक कमी असल्याने दरात चांगलीच सुधारणा झाली आहे. १३५०० ते १४००० रुपयांवरून तिळाचे दर १६००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
यवतमाळ, कारंजा (जि. वाशीम) तसेच अमरावती अशा विदर्भातील काही निवडक बाजार समित्यांमध्येच तिळाची आवक होते.
सध्या कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीत आवक होणाऱ्या तिळाच्या दरात चांगलीच सुधारणा दिसून येत आहे.
१६००० ते १६००५ याप्रमाणे तिळाचे व्यवहार होत असून आवक जेमतेम ७ क्विंटल इतकी अत्यल्प आहे.
कारंजासोबतच यवतमाळ बाजार समितीतदेखील तिळाचे दर तेजीत असून या ठिकाणी १५,९०० असा दर मिळत आहे. गेल्या पंधरवाड्यात या तिनही ठिकाणी १४ हजार रुपयांपर्यंत तिळाचे दर होते.
हंगाम संपल्याने आणि मोजक्याच शेतकऱ्यांकडे तीळ असल्याने कमी आवकेच्या परिणामी दरात सुधारणा झाल्याचे सांगितले जाते.