Pomegranate Export : डाळिंब निर्यातीला का लागला ब्रेक?

Team Agrowon

डाळिंब शेती धोक्यात

पिनहोल बोरर, शॉटहोल बोरर, तेल्या आणि मरसारख्या रोगांचा सततचा प्रभाव रोखण्यात शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आल्याने देशभरातील डाळिंब शेती धोक्यात आली आहे.

Pomegranate Export | Agrowon

क्षेत्रात घट

रोगांमुळे नव्याने डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याबरोबरच आता माग णी असूनही केवळ मागणीच्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा पुरवठा होऊ शकत नसल्याने निर्यातीलाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

Pomegranate Export | Agrowon

निर्यात घटली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५० टक्क्यांनी निर्यात घटली आहे.

Pomegranate Export | Agrowon

डाळिंब उत्पादन

जगभरातील आघाडीवरचा डाळिंब देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतात सर्वाधिक दोन लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जाते.

Pomegranate Export | Agrowon

मोठी निर्यात

भारताचा डाळिंबाच्या निर्यातीतला हिस्साही मोठा आहे.

Pomegranate Export | Agrowon

डाळिंबाची निर्यात

जगभरातील ३० हून अधिक देशात भारतीय डाळिंबाची निर्यात होते. स्पेन, इराण, टर्की, इजिप्त हे काही देश भारताचे डाळिंब उत्पादनातील स्पर्धक आहेत.

Pomegranate Export | Agrowon

निर्यातीत भारताचा मोठा वाटा

जगभरातील एकूण डाळिंब निर्यातीत २२ टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. त्यात युरोपसह अरब अमिराती, कतार, नेदरलँड आणि बांगलादेश या बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत.

Pomegranate Export | Agrowon

देशात डाळिंबाचे किती क्षेत्र?

देशात डाळिंबाचे एकूण क्षेत्र २ लाख ६६ हजार हेक्टर आहे. त्यात एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक दीड लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे.

Pomegranate Export | Agrowon
Banana Cultivation | Agrowon