Onion Rate : कांद्याचे दर का दबावात आले?

Team Agrowon

नाशिक : कांदा दराच्या (Onion Rate) घसरणीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasalgaon APMC) प्रशासक सविता शेळके यांनी व्यक्त केले.

Onion Rate | Agrowon

लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागाला निवेदन देऊन कळविण्यात आले.

Onion Rate | Agrowon

लासलगाव बाजार समितीत एकूण आवकेपैकी ८५ ते ९० टक्के आवक ही कांद्याची असते.

Onion Rate | Agrowon

सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, नगर, धुळे, जळगाव व औरंगाबाद या ५ जिल्ह्यांतून विक्रीस येतो.

Onion Rate | Agrowon

त्यापैकी ७० ते ८० टक्के कांदा निर्यातयोग्य असतो. हा कांदा प्रामुख्याने पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू आदी राज्यांत पाठविला जातो.

Onion Rate | Agrowon

काही कांदा बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मॉरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, पाकिस्तान आदी देशांना निर्यात केला जातो.

Onion Rate | Agrowon
khillar | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा