Ginger Market Rate : आल्याचे दर का वाढले?

Team Agrowon

आल्याच्या दरात तेजी

आल्याच्या दरात सध्या तेजी आली आहे. मागील काही वर्षे उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या आले पिकाने यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Ginger Rate | Agrowon

१० वर्षांतील उच्चांकी भाव

आल्याच्या भावाने अनेक बाजारांमध्ये १० वर्षांतील उच्चांकी भावाचा टप्पा गाठलेला दिसतो. कोरोनानंतर सलग तीन वर्षे आले पिकानं शेतकऱ्यांचं आर्थकारण बिघडवलं.

Ginger Rate | Agrowon

अनेक शेतकऱ्यांची आले पिकाकडे पाठ

आले पिकाला उत्पादन खर्च जास्त लागतो. पण बाजारात त्यातुलनेत खूपच कमी भाव मिळत होता. परिणामी शेतकऱ्यांना पीक परवडेना. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आले पिकाकडे पाठ फिरवली.

Ginger Rate | Agrowon

आल्याच्या उत्पादनात घट

यंदा कमी लागवड, अवेळी पाऊस आणि कीड-रोगानं पिकाचं नुकसान होऊन उत्पादन घटलं.

Ginger Rate | Agrowon

आल्याचा पुरवठा कमी

परिणामी बाजारात आल्याचा पुरवठा कमी झाला. तर बाजारात मागणी वाढली आहे. लग्नसराईचाही फायदा आले बाजाराला मिळत आहे. त्यामुळे आल्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसे आल्याचे भाव जानेवारीपासून वाढत आहेत.

Ginger Rate | Agrowon

लागवडीलाही आल्याची वाढती मागणी

सध्या अनेक हंगामातील उचांकी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. लागवडीलाही आल्याची मागणी वाढत आहे.

Ginger Rate | Agrowon

निर्यात आणि सुंठ निर्मितीसाठी मागणी

गुणवत्तापूर्ण आल्याला निर्यात आणि सुंठ निर्मितीसाठी मागणी आहे. त्यामुळे आल्याच्या दरातील तेजी चालू हंगामात टिकून राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Ginger Rate | Agrowon
Donkey | Agrowon