Sanjana Hebbalkar
कोणत्याही पदार्थात लसूण टाकला की त्याची लज्जत वाढते. सध्या चिनच्या लसणाला मागणी वाढताना दिसून येत आहे
जळगावमध्ये चीनच्या लसणाला भाव आला आहे. हा लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
काही वर्षापूर्वी हा लसूण म्हणजेच चिनचा लसूण महाराष्ट्रात बंद करण्यात आला होता. याचं कारण म्हणजे यामुळे भारतातील लसणाला कमी मागणी होती.
यामुळे या लसणाला भारतात बंदी होती मात्र तरीदेखील हा लसूण बाजारात छुप्या पद्धतीने आणला जातो असं व्यापारी सांगतात
लसूण हे चीनमधील सर्वांत महत्त्वाच्या कृषी उत्पादनापैकी एक असून, जागतिक पातळीवर निर्यातीमध्ये ७० ते ८० टकक्यांपर्यंत वाटा असतो
या लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या अतिशय मोठ्या असतात. एक पाकळी हातात सहज येण्यासारखी असते.
या लसणाचे दर देखील कमी आहेत आणि या लसणाच्या एक किलोच्या प्रमाणात केवळ सहा ते सात लसूण गड्डे बसतात.