BBF Planter: बीबीएफ पेरणी यंत्राचे फायदे; कमी खर्चात स्मार्ट शेती!

Swarali Pawar

कमी पावसात फायदेशीर

यंदा कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. अशावेळी बीबीएफ पद्धत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकते.

Modern Sowing Machine | Agrowon

बीबीएफ प्लांटर

हे ट्रॅक्टरचलित आधुनिक पेरणी यंत्र आहे. यामध्ये सरी-वरंबे, पेरणी आणि खत देणे एकाचवेळी होते.

Modern Sowing Machine | Agrowon

वेळ आणि मजुरीची बचत

वेगवेगळी कामे स्वतंत्रपणे करण्याची गरज राहत नाही. यामुळे पेरणीची कामे जलद होऊन खर्च कमी होतो.

Modern Sowing Machine | Agrowon

ओलावा टिकतो

सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने जमिनीत चांगले मुरते. यामुळे पिकांना १२ ते १५ दिवस अतिरिक्त ओलावा मिळतो.

Modern Sowing Machine | Agrowon

जास्त पावसातही फायदा

अतिरिक्त पाण्याचा निचरा सहज होतो. यामुळे मुळांना हवा मिळून पिकांची वाढ चांगली होते.

Modern Sowing Machine | Agrowon

बियाण्याची बचत

बीबीएफ यंत्रात योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरणी होते. यामुळे बियाण्याचा अपव्यय कमी होऊन बचत होते.

Modern Sowing Machine | Agrowon

कोणत्या ट्रॅक्टरची गरज?

हे यंत्र चालवण्यासाठी ३५ ते ५० HP ट्रॅक्टर पुरेसा असतो. पिकानुसार दोन किंवा चार ओळींमध्ये पेरणी करता येते.

Modern Sowing Machine | Agrowon

कमी खर्चात स्मार्ट शेती

पाण्याची टंचाई आणि वाढत्या मजुरीत बीबीएफ फायदेशीर ठरते. यामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनते.

Modern Sowing Machine | Agrowon

Seed Germination Test: बियाण्याची उगवण चाचणी का करावी? जाणून घ्या मोठे फायदे!

Agrowon
अधिक माहितीसाठी...