Anuradha Vipat
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष आणि पौष हे दोन्ही महिने धार्मिक व ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जातात. Margashirsha Month Daan
कडाक्याच्या थंडीत या महिन्यांत केलेल्या दानाचे अक्षय फळ मिळते; जाणून घेऊया कोणते दान करणे शुभ ठरते.
मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात रस्त्यावरील गरीब, वृद्ध किंवा गरजू व्यक्तींना घोंगडी, ब्लँकेट, स्वेटर किंवा शाल दान केल्यास राहू आणि शनीचे दोष शांत होतात.
तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण असतात. या महिन्यात काळे किंवा पांढरे तीळ आणि गूळ दान केल्याने सूर्य आणि शनी दोघांची कृपा प्राप्त होते.
या काळात भुकेल्यांना अन्नदान करणे, तसेच खिचडी, तांदूळ, मूग डाळ आणि शुद्ध तूप दान केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मीचा कायम वास राहतो.
पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तांब्याचे भांडे, लाल कापड किंवा गहू दान केल्यास समाजात मान-सन्मान वाढतो, नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात संध्याकाळी तुळशीजवळ, मंदिरात किंवा नदीकाठी गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.