Team Agrowon
सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. यामध्ये ज्वारीचाही समावेश होतो.
द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास तयार करताना त्यात एकदलवर्गीय पिकाचा ६० ते ७० टक्के समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये बाजरीच्या चाऱ्याचाही वापर करु शकतो.
बहुतेक सर्व तृणधान्य चारापिकापासून उत्तम मुरघास तयार होतो. ज्वारी आणि मका तर उत्तमच.
उसाचे वाढे, बाजरी, नागली, गिनीगवत, हत्तीगवत, पॅरागवत इत्यांदी चारा पिकापासूनही चांगला मुरघास तयार होतो.
चाऱ्याची कापणी करताना त्यामधील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे ६५ ते ७० टक्के असाव.
हत्ती गवताच्या प्रजाती जसे कि यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इ. गिनी गवत सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी ३० ते ४० दिवसांनी कराव्यात.
जनावरांना मुरघास देत असताना त्यातील पोषण मुल्यांच जतन करून उलट काहीसं वाढवूनच देत असतो.