Soybean Variety Selection : सोयाबीनचे नविन वाण निवडताना काय काळजी घ्यावी?

Team Agrowon

सुधारित जातींची निवड

बदलत्या वातावरणाचा विचार करता वातावरण बदलाला प्रतिकारक व स्थानिक हवामानास अनुकूल असे वाण निवडले पाहिजेत. सोयाबीन पेरणीसाठी फुले किमया, फुले संगम, जे एस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२ इ. सुधारित जातींची निवड केली जाते.

Soybean Variety Selection | Agrowon

लागवडीचे अंतर महत्त्वाचे

फुले संगम हे वाण उंच व जास्त प्रमाणात वाढणारे आहे. त्याची पेरणी करताना लागवडीचे अंतर महत्त्वाचे आहे. जर दाट पेरणी केली तर उत्पादन मिळत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

Soybean Variety Selection | Agrowon

रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त

फुले संगम हे उभट व लवचिक वाण आहे. पानांचा रंग थोडा पिवळसर असल्याने चक्री भुंगा, खोड अळी यासरख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. ही बाबही लक्षात ठेवावी.

Soybean Variety Selection | Agrowon

फुले संगम वाण

फुले संगम या एकाच वाणाची निवड करण्यापेक्षा काही क्षेत्रावर फुले संगम आणि काही क्षेत्रावर फुले किमया अशा वाणाची निवड करावी. त्यातही फुले संगम हे भारी जमिनीसाठीच निवडावे. आपली जमीन मध्यम असेल, तर फुले किमया किंवा इतर मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी.

Soybean Variety Selection | Agrowon

फुले संगम, फुले किमया आणि फुले दूर्वा

फुले संगम, फुले किमया आणि फुले दूर्वा हे तीनही वाण उत्तम व्यवस्थापनास प्रतिसाद देतात. चांगले नियोजन असल्यास त्यांच्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यामुळे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळण्याची खात्री असते. फुले संगम हे वाण उंच व जास्त प्रमाणात वाढ होणारे वाण असून, लागवडीतील अंतर योग्य ठेवावे. दाट पेरणी केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

Soybean Variety Selection | Agrowon

फुले संगम

फुले संगम हे भारी जमीन असेल तरच निवड करावे. मध्यम जमीन असेल तर फुले किमया, फूल दूर्वा किंवा इतर मध्यम कालावधीत येणारे वाण निवड करावेत.

Soybean Variety Selection | Agrowon

योग्य वाणांचा वापर

मागील दोन वर्षांपासून फुले किमया या वाणाचे उत्पादन विदर्भ आणि पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांस चांगले मिळालेले दिसून येते नवीन तंत्रज्ञानाचा आणि योग्य वाणांचा वापर करून मध्यम ते भारी जमिनीतून चांगले उत्पादन आपल्याला सहज मिळवता येवू शकते.

Soybean Variety Selection | Agrowon
beekeeping | agrowon