Team Agrowon
नविन जनावर खऱेदी करणं टाळावं.
गोठा व्यवस्थापन, नाले व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, उकिरडा व्यवस्थापन व पशुधनाच्या शरीरावरील कीटकांचे व्यवस्थापन योग्य पद्धथीने करुन जनावरांचे रक्त तपासावे.
लंम्पी आजाराला रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.
हा विषाणू जनावरांमध्ये २ ते ८ आठवड्यांपर्यंत राहू शकतो. तसेच जखमेच्या खपलीमध्ये ३५ दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
जनावराची प्रतिकार शक्ती टिकवून राहण्यासाठी जनावराला जीवनसत्त्व व खनिजे यांचा योग्य पुरवठा करावा.
लम्पी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच सर्वप्रथम शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू करावेत.