Mango Season: जुन्या आमराई पिकवायला कुठली पावडर होती?

Team Agrowon

साधारण वीस वर्षांपूर्वी मी हा आंबा बाग लावला. सरकारी भटकंती संपली, ती २०२१ जुलै मध्ये। मधले काही महिने बऱ्यापैकी सुस्तावलो। जमेल तसे लेखन वाचन करत बसलो. मांडून ठेवलेल्या या पसाऱ्याचं काय करायचं हा प्रश्न झोप येऊ देत नव्हता. मधल्या काळात शेती दुसऱ्यावर सोपवून दिलेली.

Mango Season | Shrikant Deshmukh

नको असणारे प्रचंड अनुभव आले। त्या काळात झाडे, जीवसृष्टी आणि मातीवरल्या मायेपोटी सगळे सहन करत गेली. निवृत्तीनंतर हे जमणारे नव्हते. शेती हा प्रकार लांबून पाहणाऱ्यांना फार गोंडस वगैरे वाटतो. पण कायम शेतकऱ्याच्या बुडाशी लागलेला जाळ कोणाला दिसत नाही.

Mango Season | Shrikant Deshmukh

चार दोन रुपयासाठी घासाघीस करणारा आपला शहरी माणूस, त्याच्याबद्दल काय बोलणार? आंब्याची झाडे खूप वाढलीत. म्हणावे तसे उत्पन्न नाही. घातलेला खर्च निघत नाही. माणसं, वानरं, धुकं, हवा, वादळ असे कितीक शत्रू भोवती. त्यातून बाग वाचवणे हे एक दिव्य असते.

Mango Season | Amit Gadre

काही हाती लागलेच शेवटी तर आपला आदरणीय शहरी ग्राहक एक किलो आंबा घेतानाही कुठेतरी कोटींचा सौदा करायला बसला की काय असे वाटून जाते. हे फळ त्यांच्यापर्यंत कुठल्या दिव्यातून पोहोचले आहे, शेतकऱ्याने त्यासाठी किती रक्त सांडले, आणि घाम गाळला हे त्याला दिसत नाही. देशाच्या सीमेवरच जवान शहीद होतात असे नाही, शेती करताना पिढ्यानपिढ्या शहीद होतात. पण त्यांना शहीद मानले जात नाही.

Mango Season | Amit Gadre

तूर्तास आंब्यापुरते. बाजारात येणारा ९९% आंबा हा दलाल आणि व्यापारी लोकांमार्फत येतो. त्याचा वरुन दिसणारा पिवळा रंग बघून ग्राहकाला भुरळ पडते। चव मात्र पूर्ण गमावून बसलेला हा फळांचा राजा असतो. बाजारात ग्राहकांची दिशाभूल करणारी पूर्ण यंत्रणा असते.

Mango Season | Maharudra Mangnale

त्यांना यातले काहीही कळत नाही असे गृहीत धरले जाते. ते बरेचसे खरेही असते. केवळ कमी किमतीत मिळतो म्हणून घेणारेही खूप असतात. विक्रेत्यांचे शब्द असतात, पावडर के बिना आम पकता ही नही. जुन्या आमराया पाडाला आल्या की उतरवून घेत. तिथे कुठली पावडर होती?

Mango Season | Maharudra mangnale
Honey Bee | Agrowon